पर्याय प्रवास विमा पॉलिसीचा

    दिनांक :29-Jul-2019
सध्या भारतीय मोठ्या प्रमाणावर परदेश वारी करत आहेत. परदेश प्रवासादरम्यान महत्त्वाचा असतो तो परदेश प्रवास विमा. आंतरराष्ट्रीय प्रवास विम्याामुळे परदेशात फिरताना आर्थिक संरक्षण लाभतं. जवळपास प्रत्येक विमा कंपनी स्थानिक आणि परदेश प्रवास विमा पॉलिसी उपलब्ध करून देते. विमा कंपन्यांसोबतच आता आर्थिक क्षेत्रातल्या स्टार्ट अप्सही प्रवास विमा क्षेत्रात उतरल्या आहेत. या कंपन्या छोट्या विमा पॉलिसी उपलब्ध करून देतात. या पॉलिसींच्या िंकमती इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत कमी असतात. फक्त 400 रूपये भरून तुम्हाला 180 दिवसांची विमा पॉलिसी मिळू शकते. अपघात, पासपोर्ट, सामान हरवणं अशा प्रसंगांमध्ये या पॉलिसी आपल्याला विमा संरक्षण देतात. 
 
 
भारतीय प्रवास विमा घेण्याबाबत फारसे जागरूक नसतात, असं निरिक्षण तज्ज्ञांनी नोेंदवलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेच्या अहवालानुसार 2020 पर्यंत परदेशात प्रवास करणार्‍या भारतीयांची संख्या 50 दशलक्षांच्या घरात जाईल. दहा वर्षांपूवी हाच आकडा अवघ्या आठ दशलक्षांच्या घरात होता. अशा परिस्थितीत प्रवास विम्याचं महत्त्व वादातीत आहे. दुसरं म्हणजे अगदी थायलंडसारख्या आशिया खंडातल्या देशातही वैद्यकीय सेवांवर दिवसाला 500 डॉलर इतका खर्च करावा लागतो. हा आकडा प्रवास विम्याचं महत्त्व अधोरेखित करतो.
 
स्टार्टअप्सनी काढलेल्या विमा पॉलिसी जवळपास प्रत्येक देशात विमा संरक्षण उपलब्ध करून देतात. 50 हजार डॉलरपर्यंतच्या वैद्यकीय खर्चासाठी तुम्हाला विमा संरक्षण मिळू शकतं. अर्थात या पॉलिसींच्याही नियम व अटी आहेतच. तरूण वर्ग, पहिल्यांदाच विमा पॉलिसी घेणारे िंकवा कोणतंही विमा संरक्षण नसणार्‍यांसाठी अशा पॉलिसी योग्य टरतात.