विद्रुपा नदीच्या पुरात युवक वाहून गेला

    दिनांक :29-Jul-2019
तेल्हारा,
तालुक्यातील विद्रुपा नदीला आलेल्या पुरात भोकर येथील २० वर्षीय युवक नितीन सुनील दामोधर वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 
 
 
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथून जवळच असलेल्या भोकर येथील नितीन दामोधर हा युवक बकऱ्यांसाठी चारा आणण्याकरीता सकाळी विद्रुपा नदीकाठावर गेला होता. पावसामुळे नदीला पूर आला असून, काठ निसरडा झाला आहे. काठावरून पाय घसरल्याने नितीन पुरात वाहून गेला. नितीन नदीत पडल्याची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी नदीकाठावर धाव घेतली व त्याचा शोध सुरु केला. तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन शोधमोहिमसाठी सहकार्य केले. ग्रामस्थ नदीपात्रात उतरून नितीनच शोध घेत असून,अद्याप त्याचा शोध लागला नव्हता.