गडचिरोली,
पोटेगाव जंगल परिसरात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला आहे. मृत नक्षल्याचा मृतदेह पोलिस पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ही चकमक झाली.
पोटेगाव जंगल परिसरात नक्षलविरोधी शोधमोहिम राबविताना चकमक उडाली. या चकमकीनंतर नक्षली जंगलात पसार झाले. मात्र एका नक्षल्याचा मृतदेह हाती लागल्याची माहिती आहे. या चकमकीत आणखी काही नक्षली ठार अथवा जखमी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.