अशी होणार बिचुकलेची घरात एण्ट्री

    दिनांक :29-Jul-2019
‘बिग बॉ़स मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा घरात पोहोचला आहे. २८ जुलै रोजी तो बिग बॉसच्या घरात पोहोचला आणि त्याची ही एण्ट्री प्रेक्षकांना २९ जुलै रोजीच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. सातारा पोलिसांनी बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी बिग बॉसच्या घरातूनच अटक केली होती. आता घरात त्याची पुन्हा एकदा धमाकेदार एण्ट्री होणार आहे.
 
 
अभिजीत बिचुकले घरात येत असल्याची घोषणा होताच बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. शिवानी सुर्वे आणि बिचुकले यांच्यात चांगलीच मैत्री असल्याने तिला फार आनंद होतो. ‘अगर एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै खुदा की भी नहीं सुनता’ हा डायलॉग म्हणत बिचुकले बिग बॉस रहिवाशी बोर्डावर आपल्या नावाची पाटी लावतो. घरात पोहोचताच तो प्रेक्षकांचेही आभार मानतो.
बिचुकलेची घरात पुन्हा एकदा एण्ट्री झाल्यानंतर घरात कोणकोणते नवनवीन बदल होणार किंवा घरात जे गृप पडले आहेत, त्या गृपपैकी बिचुकले कोणता गृप जॉईन करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.