आरोग्य विम्याचं पुनमूर्ल्यांकन

    दिनांक :29-Jul-2019
आरोग्य विम्याचं महत्त्व आपण सर्वजण जाणतो. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आरोग्य विम्याचं पुरेसं संरक्षण मिळायला हवं. म्हणूनच फक्त आरोग्य विमा पॉलिसी घेऊन भागत नाही तर वेळोवेळी त्याचं पुर्नमूल्यांकन होणं गरजेचं आहे. मात्र प्रत्यक्षात असं मूल्यांकन होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत एखादं मोठं आजारपण तुमची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून टाकतं. आरोग्य विमा पॉलिसीचं पुर्नमूल्यांकन नेमकं कधी करायला हवं याविषयी...
 
  • नोकरी बदलल्यानंतर  बढती मिळाल्यानंतर पगारवाढ होते. हा आनंद आपण साजरा करतो. मात्र याच काळात आरोग्य विमा पॉलिसीचं पुर्नमूल्यांकन व्हायला हवं. गरजेनुसार आरोग्य विम्याची रक्कम वाढवता येईल. तसंच पॉलिसीला काही ॲड ऑन्सची जोड देता येईल. यामुळे भविष्यात वैद्यकीय खर्चाचा ताण तुमच्यावर येणार नाही.
  • लग्न हा प्रत्येकाच्याा आयुष्यातला आनंदाचा क्षण. लग्नानंतर जबाबदार्‍या वाढतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या आरोग्यविम्याची तरतूद करायला हवी. पती-पत्नींना पुरेसं आरोग्य विमा संरक्षण मिळवून देणार्‍या पॉलिसीची निवड करावी.
  • कुटुंबात नव्या सदस्याचं म्हणजे बाळाचं आगमन झाल्यानंतर आरोग्यविम्याचं मूल्यांकन व्हायला हवं. गर्भधारणा झाल्यानंतर बाळंतपणातल्या सर्व खर्चांसाठी विमा संरक्षण घ्यायला हवं.
  • सध्याच्या विमा कंपनीचे काही बरेवाईट अनुभव आले तर तातडीने दुसर्‍या कंपनीची विमा पॉलिसी घ्यावी.
  • निवृत्तीनंतर आरोग्य विम्याच्या ज्येष्ठ नागरिक योजनेची निवड करावी. यामुळे पती-पत्नींना उतारवयात योग्य विमा संरक्षण मिळू शकेल.