नऊ महिन्यानंतर अर्जुननी काढली टोपी

    दिनांक :29-Jul-2019
एखाद्या भूमिकेसाठी केलेला लूक बाहेर येऊ नये म्हणून कलाकार मेहनत घेत असतात. आगामी 'पानिपत' या चित्रपटासाठी अभिनेता अर्जुन कपूरलाही तेच करावं लागलं.
 
 
 

 
 
गेले नऊ महिने तो वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या वापरत होता. सदाशिवरावभाऊ पेशवे या भूमिकेसाठी त्यानं फक्त शेंडी ठेवली होती. हा लूक बाहेर येऊ नये, यासाठी तो आटोकाट मेहनत घेत होता. चित्रपटाच्या कलाकारांकडून तसं टीमनं लिहून घेतलं होतं म्हणे. याविषयीचा एक व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला आहे.