लिबियात अवैध स्थलांतरित केंद्रावर हवाई हल्ला, 40 जण ठार

    दिनांक :03-Jul-2019
त्रिपोली,
लिबियातील अवैध स्थलांतरित केंद्रावर झालेल्या हवाई हल्ल्यात 40 जणांना मृत्यू झाला आहे. 80 पेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झाले आहेत. लिबियामध्ये सध्या गृहयुद्ध सुरू असून, हा हल्ला कोणी केला याबाबत अजून स्पष्टता नाही. लिबियाची राजधानी त्रिपोली येथील तजौरामध्ये हा हल्ला झाला. आपात्कालीन सेवेचे प्रवक्ते मालेक मर्सेक यांनी सांगितले की, सरकारने या हल्ल्यासाठी ‘खलिफा हफ्तार’ या संघटनेला जबाबदार धरले आहे.
 

 
 
अवैधरीत्या इटलीला जाणार्‍या आफ्रिकन प्रवाशांसाठी लिबिया हे मुख्य केंद्र आहे. याठिकाणाहून गरीब आणि युद्ध परिस्थितीमुळे स्थलांतर करणारे आफ्रिकन इटलीला पलायन करतात. मात्र, या प्रक्रियेत अनेक प्रवाशांना लिबिया पोलिस अटक करतात. या प्रक्रियेला युरोपियन महासंघाने विरोध केला आहे. अवैधरीत्या प्रवाशांना लिबियात वास्तव्य करण्यास बंदी आहे. लिबियामध्ये अशा अवैध प्रवाशांना कैदेत ठेवले जाते.