अंकिता लोखंडेला विकीने केलं प्रपोज

    दिनांक :03-Jul-2019
हिरोने गुडघ्यावर बसून हिरोईनला प्रपोज केल्याचं आपण अनेकदा चित्रपटांमध्ये बघतो. पण अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत असं प्रत्यक्षात घडलंय. बॉयफ्रेंड विकी जैन याने अंकिताला अशाच फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं आहे. त्यावर अंकितानेही मजेशीर उत्तर दिलं आहे. प्रपोज करतानाचे रोमॅण्टिक फोटो अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. व्यावसायिक विकी जैन व अंकिता गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

 
 
‘याबाबत मी विचार करेन,’ असं कॅप्शन देत अंकिताने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. विकी जैन मुंबईतील एक व्यावसायिक आणि बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहमालक आहे. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता आणि विकी एकमेकांजवळ आले. दोघांच्याही जवळच्या व्यक्तींना या नात्याबद्दल ठाऊक आहे. नुकताच अंकिताचा वाढदिवस साजरा झाला आणि त्या पार्टीत विकीसुद्धा हजर होता.
 
 
अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मालिकेत अंकितासोबत सुशांतची मुख्य भूमिका होती. या मालिकेच्या सेटवरच अंकिता आणि सुशांतची मैत्री झाली. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. सहा वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. अंकिताने नुकतंच ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने झलकारी बाईची व्यक्तिरेखा साकारली होती.