वर्ल्डकपनंतर धोनी क्रिकेटमधून होणार निवृत्त

    दिनांक :03-Jul-2019
नवी दिल्ली,
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संथ खेळी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याच्यावर चौफेर टीका सुरू असताना, आयसीसी वर्ल्डकप २०१९ नंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्येच धोनी आपला शेवटचा सामना खेळेल, असे वृत्त पीटीआयने एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.
 
 
गेल्या काही दिवसांपासून धोनी टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. विशेषत: वर्ल्डकपमध्ये त्याचा संथ खेळ टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. इतकेच नाही, तर वर्षभरापासून धोनीची उत्कृष्ट मॅच फिनिशर अशी छवी देखील धूसर होऊ लागली आहे. धोनी निवृत्त होणार याचा अंदाज वर्ल्डकरपूर्वीपासूनच बांधला जात होता.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील फलंदाजीवरही झाली होती टीका
धोनीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत केवळ २८ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीवरही टीका झाली होती. त्या वेळी केवळ त्याच्या चाहत्यांनीच नाही, तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही नाराजी व्यक्त केली होती. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात घोनी मोठे फटके खेळू शकला नाही. यामुळे त्याच्यावर टीका झाली. या वर्ल्डकपमध्ये फिरकी गोलंदाजांपुढेही धोनीला संघर्ष करावा लागत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात देखील धोनी आपला नैसर्गिक खेळ दाखवू शकला नाही.