ताडोबात रणदीप हुड्डाला 'लारा'चे दर्शन

    दिनांक :03-Jul-2019
मोहुर्ली वन विश्रामगृहात केले वृक्षारोपण
चंद्रपूर,
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगात देखण्या वाघांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. मंगळवारी बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने ताडोबाला भेट दिली. रणदीपने दुपारी ताडोबा जंगलात सफारीला प्राध्यान्य दिले. येथील लारा वाघिणीने बछड्यांसह त्याला निराश केले नाही. देखण्या वाघिणीच्या दर्शनाने तो भारावून गेला. विशेष म्हणजे, वन आणि वन्यजीवांबद्दल भावनीक असल्याचे त्याने वनाधिकार्‍यांनी सांगितले. 

 
 
रणदीप हुड्डाचे आज नागपुरात आगमन झाल्यानंतर विमानाची वेळ चुकल्याने त्याने फावला वेळ ताडोबात घालविण्याचा निर्धार केला. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो ताडोबात दाखल झाला. त्यानंतर दुपारी अडेगाव ते देवाडा मार्गावर सफारी करीत असताना त्याला देखण्या वाघिणीने बछड्यांसह दर्शन दिले. 
 
सध्या राज्यात वनमहोत्सव सुरू आहे. वन आणि वन्यजीवांबद्दल ते भावनिक असल्याने त्याने मोहुर्ली वन विश्रामगृहाला भेट दिली. तिथे त्याने वडाचे वृक्ष लावले. 
 
दरम्यान, जिप्सी चालक, गाईड यांच्यासह काही जणांसोबत हुड्डाने छायाचित्र काढले. जंगल आणि येथील वाघ खुपच आवडले असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी अनिल कुंबळे, ब्रॉयन लारा यंनीही ताडोबाला भेट देऊन येथील जंगल येथील जंगल सफारीचा आनंद लुटला होता.