सलमान सांगतोय 'प्रेम करणं कधी सोडू नका'

    दिनांक :03-Jul-2019
मुंबई,
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची चित्र काढण्याची आवड सर्वांनाच माहित आहे. वेळ मिळेल तेव्हा तो रंगांशी खेळताना दिसतो. त्यानं रेखाटलेल्या अनेक चित्रांचं कौतुक देखील झालं आहे. सलमाननं नुकचात एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात तो चित्र रेखाटना दिसत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत सलमान त्याच्या हर दिल जो प्यार करेगा या गाण्यावर चित्र रेखाटतोय. एका कोऱ्या कागदावर एक चेहरा रेखाटला असून दुसऱ्या पानावर काही ओळी लिहील्या आहेत. 'एवढं करा की, कधी कमी पडायला नको, पण नेहमी कमीचं पडतं.. ' ('इतना करो कि कभी कम न पड़े, पर साला कम पड़ ही जाता') असं लिहिलं आहे. तर शेवटच्या पानावर प्रेम करणं कधी सोडू नका' (प्यारकरना मत छोड़ना) असं लिहिलंय.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लाखो चाहत्यांनी लाइक केला आहे. तर काही चाहत्यांनी या व्हिडिओवर मजेशीक कमेंट्स करून सलमानची तुलना वेलकम चित्रपटातील मजनू भाईशी केली आहे.