तारक मेहतामधून दिशा वकानी बाहेर

    दिनांक :03-Jul-2019
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका गेल्या अनेक दिवस चर्चेत आहे. दयाबेन अर्थात दिशा वकानी या मालिकेतून जवळपास दीड वर्षे गायब आहे. गेल्या काही दिवसांपासून दया मालिकेत परतणार असल्याची चर्चा रंगली होती. आता मात्र आता एक वेगळीच माहितीसमोर येतेय. मालिकेच्या निर्मात्याने या भूमिकेसाठी ऑडिशन घेणे सुरु केले आहे.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार निर्मात्यांना नवी दयाबेन सापडली आहे. अभिनेत्री विभूती शर्मा मालिकेमध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार आहे. विभूतीने याआधी बडे अच्छे लगते है, हमने ली है शपतसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. विभूतीने अजून ही मालिका साईन नाही केली. कारण निर्माते असीमकुमार मोदींना या भूमिकेशी कोणतीच तडजोड नाही करायची. मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे त्यांना कोणतीच रिस्क घ्यायची नाही आहे.
दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मेटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती शोमध्ये येईल असे बोलले जात होते. 2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. मुलीच्या देखरेखीत व्यस्त असल्यामुळे दीशाने मालिकेत ब्रेक घेतला होता. मात्र दीड वर्षांनंतर ही दया मालिकेत परतली नाही. दिशाच्या पतीने मालिकेत हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. मेकर्सना दिशाच्या पतीने सांगितले की, ती महिन्यातून 15 दिवस आणि फक्त दिवसातून 4 तास काम करणार. निर्मात्यांनी दिशाला 30 दिवसांत परतण्याचा वेळ दिला होता.