मोनॅको आणि पर्यटन

    दिनांक :30-Jul-2019
नीलेश जठार
9823218833
 
एखादा देश एका तासाच्या भटकंतीत फिरता येतो, असे सांगितले तर त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मात्र फ्रान्सला लागून असलेला ‘मोनॅको’ हा चिमुकला देश खरोखरच 1 तासात पायी फिरता येतो. विशेष म्हणजे या चिमुकल्या देशात प्रचंड संख्येने पर्यटक येतात व जगातील श्रीमंत देशात त्याची गणना होते. या देशाचे क्षेत्रफळ अवघे 1.95 चौरस किलोमीटर असून मोनॅको असेच या देशातील एकमेव शहराचे नाव आहे. हा देश फॉर्म्युला कार रेिंसग, जगप्रसिद्ध कॅसिनो व उत्तम हवामानाबद्दल जगभरात प्रसिद्ध आहे. वर्षाचे साधारण 8 महिने फिरण्याकरिता उत्तम असलेल्या मोनॅकोमध्ये सर्व वयाच्या सर्वांसाठी सगळं काही उपलब्ध आहे. आश्चर्य म्हणजे जगातील कुठलंही प्रॉडक्ट असो ते मोनॅकोच्या बाजारात उपलब्ध आहे, मग ते भारतीय अमूल असो व रशियन टॅटज! 
 
 
सबकुछ ‘मोनॅको’ में मिलता है! हे 48 देशांची स्वतंत्र रेस्टॉरेंट ही या मोनॅकोची वैशिष्ट्य! म्हणजे मोनॅकोमध्ये जाऊन आपल्या देशाची खाद्य संस्कृती मिस करण्याचे काम नाही. हे सगळं इतका सहज उपलब्ध करून देण्यामागे एकच कारण की मोनॅकोमध्ये एक पण इंडस्ट्री नाही िंकवा कृषी उत्पादन नाही िंकवा असे स्वतःचे कुठलेही प्रॉडक्शन नाही, जे विकून त्याने देश चालवता येईल. साधारण 80 टक्के आयात करणारा एकमेव श्रीमंत देश म्हणून मोनॅकोचे नाव अग्रेसर आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोनॅको हा देश चालतो कसा? मोनॅकोचे उत्पन्नाचे मुख्य सोर्स कुठला तर तो आहे ‘पर्यटन!’ जगातील 35 टक्के लोक दरवर्षी मोनॅकोला व्हिजीट देतात, त्यामुळे विश्वातून येणार्‍या पर्यटकांसाठीत त्यांच्या आवडीनिवडी खाद्य संस्कृती जोपासणं हे मोनॅको सरकारचे ध्येय आहे.
 
मोनॅको सरकार पर्यटकांकडून व्हिसा आणि अन्य टुरिस्ट चार्जेसच्या मार्गे इतकं उत्पन्न निर्माण करतेय्‌ की जनतेला अनेक सुविधा त्या मोफत देऊ शकत आहेत. मोनॅकोमधील आकर्षण म्हणजे येथे नागरिकांना आयकर भरावा लागत नाही. नागरिकांना अव्वल दर्जाची सुरक्षा व सुविधा दिल्या जातात. मेडिटेरियन समुद्राच्या उत्तरमध्य किनार्‍यावरचा हा देश तीन बाजूंनी फ्रान्सने वेढलेला आहे व इटाली येथून अवघ्या 16 किमीवर आहे. देशात फ्रेंच भाषा बोलली जाते. येथे होत असलेले फॉर्म्युला कार रेिंसग, जगप्रसिद्ध मॉंटेकार्लो कॅसिनोे, व शाही परिवाराची शानशौकत ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. येथे राहणारे बहुतेक नागरिक श्रीमंत आहेत व त्यांचे परदेशांशी संबंध आहेत. 1927 पासून येथे राजेशाही आहे.
 
या चिमुकल्या देशातील क्वार्टियर गोल्डन स्कवेअर मध्ये फॅशनेबल हॉटेल्स, नाईटक्लब, रेस्टॉरंट, बुटीक्सची एकच भाऊगर्दी आहे. कार रेिंसगबरोबरच येथे गोल्फ, फूटबॉल, वॉटर स्पोर्टस यांच्याही स्पर्धा सतत होत असतात. व्हॅटिकन सिटी नंतरचा हा जगातला दुसरा छोटा देश आहे. येथे ऐतिहासिक आर्किटेक्चरल कॅथेड्रल दे मोनाको, 7 हजार प्रकारचे कॅक्टस असलेले उद्यान, जपानी गार्डन, 13 व्या शतकातील शाही निवास पॅलेस डू प्रिन्स, 4 हजार प्रकारचे गुलाब असलेले बगिचे, सरोवरातील हंस अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पायी चालायचे नसेल तर बस घेता येते. फ्रान्समधून येथे बस व रेल्वेने जाता येते.वार्षिक मोनॅको उत्सवात दरवर्षी 40 लाखांहून जास्त लोक येतात आणि याच उत्सवात वर्षभराचे उत्पन्न मोनॅको सरकार कमावून घेते