तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात

    दिनांक :30-Jul-2019
तिरोडा,
आज दि 30 जुलै ला तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अड़कले.
प्राप्त माहिती नुसार धारगाव जि भंडारा निवासी तक्रारदाराचा ट्रक क्रमांक MH 36 –AA 2358 हा तुमसर तालुक्यातील चारगाव रेती घाटावरुन रेती वाहतूक करीत असताना बोदलकसा जंगलात तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके यानी पकड़ला व कारवाही न करता सोडन्याकरीता व पुढे अवैध रेती वाहतूक करण्याकरिता 70 हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकड़े तक्रार केली. आज दि 30 जुलैला तहसीलदार रामटेके यांनी साथीदार विपिल सिद्धार्थ कुंभारे याचे हस्ते रकम स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांच्या विरोधात पोलिस स्टेशन तुमसर येथे कलम 7, 12 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.