पर्लकोटा नदीवरील पूर ओसरला; भामरागड मार्ग सुरु

    दिनांक :31-Jul-2019
गडचिरोली,
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आज दुपारी पाऊस थांबल्यानंतर पूर्वपदावर येऊ लागले आहे. भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरील पाणी ओसरले असून, संध्याकाळपासून वाहतूक सुरळीत झाली आहे. 
 
 
भामरागड शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून, आज संध्याकाळपासून मोबाईल सेवा पूर्ववत सुरु झाली आहे. मात्र, पूर आल्यानेआरमोरी-कढोली-वैरागड हा मार्ग बंद झाला आहे. गोसेखुर्द धरणाचे १७ दरवाजे अर्धामीटरने उघडण्यात आले असून, त्यातून १७९४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.