कागदी लिंबू लागवड तंत्रज्ञान

    दिनांक :31-Jul-2019
पूर्वमशागत ः जमिनीची निवड झाल्यानंतर ती उभी-आडवी चांगली नांगरूण घ्यावी. जमीन भुसभुशीत होण्यासाठी कुळावाच्या 3-4 पाळ्या द्याव्यात. त्यामुळे ढेकळ फुटून जमीन सपाट होईल. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लागवडीसाठी सर्वसाधारणपणे 5 बाय 5 सें.मी. अंतरावर 60 बाय 60 सें.मी. आकाराचे खड्डे उन्हाळ्यात खोदून तयार करावेत. चांगले कुजलेले शेणखत व चांगली पोयट्याची माती यांचे समप्रमाणात मिश्रण तयार करून व या मिश्रणात फॉलीडॉल पावडर अंदाजे 100 ग्रॅम मिसळून खड्डे भरून घ्यावेत. खड्डे शेणखत-माती मिश्रणाने भरण्यापूर्वी प्रत्येक खड्याचे तळाशी 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो निम पावडर टाकावी.
 
 

 
 
 
रोपांची पुनर्लागवड ः रोपांची उंची 22 ते 25 सें.मी. झाल्यानंतर (40 ते 60 दिवसांनी) पावसाळ्यात लागवड करावी. रोपांची लागवड करण्यापूर्वी गरज असल्यास जमिनीला पाणी द्यावे (खड्डे ओले करून घ्यावेत). म्हणजे खत-माती मिश्रणाने भरलेले खड्डे स्थिर होऊन खाली बसतील. वाफसा आल्यानंतर लागण सुरू करावी. दुपारी थोडे ऊन कमी झाल्यानंतर रोपांच्या लागवडीस सुरुवात करावी. रोपे तयार झालेल्या पिशव्यांचे तळ फोडून टाकून मुळांना इजा होणार नाही याची दक्षता घेऊन रोप खड्यात लावावे. रोपे लावतांना मुळाभोवती पोकळी राहू न देता सभोवतालची माती घट्ट दाबावी.
 
खत व्यवस्थापन ः पपई हे जलद वाढणारे, जास्त उत्पादन देणारे, त्याचबरोबर जास्त अन्नद्रव्ये शोषण करणारे फळझाड आहे. त्यामुळे पपईच्या झाडांना वर्षभर खतांची उपलब्धता करावी लागते. झाडाच्या वाढीच्या काळात भरखताबरोबर वरखतांचे हप्ते द्यावेत. वर खतांच्या मात्रा दिल्यानंतर झाडाची वाढ, उत्पादनात वाढ दिसून येते.
 
जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास लागवडीपासून चौथ्या आणि आठव्या महिन्यात झिंक सल्फेट 0.5 टक्के व बोरिक अॅसिड 0.1 टक्का तीव्रतेची झाडावर फवारणी करावी. सदरचे द्रावण तयार करण्यासाठी झिंक सल्फेट 5 किलो आणि बोरिक अॅसिड 1 किलो 100 लिटर पाण्यात विरघळून तयार करावे.
लागवडीनंतर खतांची मात्रा दर झाड (ग्रॅम) ः
महिना नत्र स्फुरद पालाश
पहिला 50 50 50
तिसरा 50 50 50
पाचवा 50 50 50
सातवा 50 50 50
पाणी व्यवस्थापन ःलिंबूच्या झाडास बांगडी पद्धतीने पाणी द्यावे. उन्हाळ्यात 10 दिवसांच्या अंतराने, हिवाळ्यात 20 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हस्तबहार मिळविण्यासाठी 500 ते 1000 पीपीएम सायकोसीलची फवारणी केल्यास सप्टेंबर महिन्यात फळे उपलब्ध होऊ शकतात. मात्र, अशा फवारणी तंत्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली घ्याव्यात.
आंतरपिके ःलिंबू फळझाडे वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत फळधारणे योग्य होत नाहीत. परिणामतः झाडांमधील अंतर 5 बाय 5 मीटर मोकळे राहत असल्यामुळे वाया जाते. म्हणून कमी कालावधीची हंगामी पिके घेतल्यास फायदेशीर ठरते. खरिपात सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व चवळीसारख्या पिकांसोबत घेतल्यानेलिंबू फळवाढीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही तसेच आंतरपिकाचे उत्पादनसुद्धा चांगले येते. जमिनीचा कससुद्धा वाढतो.
बहार व्यवस्थापन ः कागदी िंलबाच्या झाडाला वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र, उन्हाळ्यात उपलब्ध होणार्‍या िंलबाला चांगला भाव मिळतो. या काळातलिंबू फळांची उपलब्धता वाढविण्यासाठी हस्तबहाराचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. हस्तबहार घेण्यासाठी आवश्यक असलेला पाण्याचा ताण देणे पावसाळ्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) शक्य होत नसल्यामुळे हस्तबहार घेणे ही समस्या आहे. परंतु, काही उपाययोजना करून त्यावर मात करता येऊ शकते.
पावसाळ्यात सुरुवातीला जून महिन्यात शेंड्याकडून 30 सें.मी. पर्यंत फांद्याची छाटणी करावी. क्लोरामक्कॅट क्लोराईड (सी.सी.सी./लिओसीन) या रसायनाच्या 2000 तीव्रतेच्या दोन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने ऑगस्ट महिन्यात कराव्यात िंकवा झाडाच्या 4-5 मुख्य फांद्यांवरील 0.3 सें.मी. रुंदीची साल गोलाकार पद्धतीने धारदार चाकूच्या साहाय्याने ऑगस्ट महिन्यात काढून टाकावी. साल काढलेल्या जागेवर कॉपर ऑक्सिक्लोराईड िंकवा बोर्डो मिश्रणाचा लेप लावावा. ऑक्टोबर महिन्यात झाडांना ओलित सुरू करावे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात फुले येतात व मार्च-एप्रिल-मे महिन्यात हेक्टरी 15 टनापर्यंत उत्पादन मिळते.
उत्पादन ः प्रत्येक झाडापासून 2000 ते 3000 फळे मिळतात.
• डॉ. सोनाली वानखडे
• डॉ. आशिष चौधरी
कृषी संशोधन केंद्र, अचलपूर