'जागो मोहन प्यारे'नाटक आता चित्रपट रुपात

    दिनांक :31-Jul-2019
मुंबई,
एके काळी मराठी रंगभूमी गाजवलेलं आणि अभिनेता सिद्धार्थ जाधवला वेगळी ओळख मिळून देणारं 'जागो मोहन प्यारे' हे नाटक आता मोठ्या पडद्यावर येत आहे. या नाटकाचा सिनेमा होतोय. चित्रपटातही सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच अनिकेत विश्वासराव आणि दीप्ती देवी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

नुकतच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच केलं असून, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुुरुवात झाली आहे. नव्या वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियदर्शन जाधव यावेळी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहे. नाटकाप्रमाणेच चित्रपटाचं लेखनही प्रियदर्शननं केलं आहे. मराठी रंगभूमीवर दमदार प्रतिसाद मिळवलेल्या 'मोहन'ची नक्कीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.