बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर

    दिनांक :04-Jul-2019
नवी दिल्ली,
बीसीसीआयने बुधवारी उशीरा आपल्या २०१९-२० वर्षासाठीच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दुलिप करंडकाने यंदाच्या हंगामाची सुरुवात होणार आहे. तर भारतीय क्रिकेटमध्ये मानाचं स्थान असलेली रणजी करंडक स्पर्धा ९ डिसेंबर ते १३ मार्च २०२० या कालावधीत खेळवली जाणार आहे. 

 
२०१९-२० सालातले भारतीय क्रिकेटचे वेळापत्रक –
१७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०१९ – दुलिप करंडक
२४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०१९ – विजय हजारे करंडक
३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१९ – देवधर करंडक
८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ – सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा
९ डिसेंबर ते १४ फेब्रुवारी २०२० – रणजी करंडक (साखळी फेरी)
१९ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२० – रणजी करंडक (बाद फेरी)
१८ मार्च ते २२ मार्च २०२० – इराणी करंडक