क्रीडामंत्री रिजिजू यांनी पाठविल्या विराट व चमूला शुभेच्छा

    दिनांक :04-Jul-2019
नवी दिल्ली,
इंग्लंडमध्ये आयसीसी विश्वचषक कि‘केट स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयी घोडदौडीबद्दल क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी विराट कोहली आणि त्याच्या चमूचे अभिनंदन केले तसेच उपांत्य सामन्यासाठी शुभेच्छा पाठविल्या आहेत. 

 
 
बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी क्रीडा मंत्री रिजिजू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रिजिजू यांनी विराट कोहली, मु‘य प्रशिक्षक रवी शास्त्री व भारतीय संघातील खेळाडूंना लिहिलेले पत्र खन्ना यांच्याकडे सुपूर्द केले.
 
भारतीय संघाच्या कामगिरीमुळे संपूर्ण देश प्रेरित झाला आहे. सर्व सामन्यातील तुमची जिद्द, चिकाटी, कौशल्य, कणखरता आणि खिलाडूवृत्ती प्रशंसनीय आहे, असे रिजिजू यांनी पत्रात म्हटले आहे.
 
शनिवारी भारताचा अखेरचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. तसे भारताने आधीच उपांत्य फेरीत आपले स्थान सुनिश्चित केलेले आहे. गुणतालिकेत भारत सध्या दुसर्‍या स्थानावर आहे. जर भारताने श्रीलंकेवर मात केली आणि ऑस्ट्रेलिया दक्षिण आफि‘केकडून हरला तरीही भारत दुसर्‍या स्थानी कायम राहील.