FIFA : नेदरलॅण्डची अंतिम गाठ अमेरिकेशी

    दिनांक :04-Jul-2019
लियॉन, 
अतिरिक्त वेळेत आक्रमक खेळाडू जॅकी ग्रोएनेनने नोंदविलेल्या महत्त्वपूर्ण एकमेव गोलच्या बळावर नेदरलॅण्डने स्विडनवर 1-0 ने रोमांचक विजय नोंदवून फिफा विश्वचषक महिला फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता या आठवड्याच्या अखेरीस नेदरलॅण्डला जगज्जेतेपदासाठी अमेरिकेशी निर्णायक झुंज द्यावी लागणार आहे. 
 
 
लियॉनयेथे रंगलेल्या नव्वद मिनटांचा हा संघर्षपूर्ण सामना गोलशून्यने बरोबरीत राहिला होता. त्यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला. यात 99 व्या मिनिटाला जॅकी ग्रोएनेन ही कोंडी फोडली आणि स्विडनच्या आशेवर पाणी फेरत आपल्या नेदरलॅण्ड संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. मिडफिल्डर जॅकी ग्रोएनने अलिकडेच युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये युवा खेळाडू म्हणून कांस्यपदक मिळविले होते.
 
शनिवारी नाईस येथे स्विडन आणि इंग्लंड यांच्यात तिसर्‍या क्रमांकासाठी सामना खेळला जाणार आहे.