लीबियामध्ये अवैध प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला

    दिनांक :04-Jul-2019
40 जणांचा मृत्यू तर 80 जण जखमी
त्रीपोली,
लीबियातील अवैध प्रवासी केंद्रावर झालेल्या हवाई हल्ल्‌यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर 80 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. लीबियामध्ये सध्या गृहयुद्ध सुरु आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्विकारलेली नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लीबियाची राजधानी त्रिपोली येथील तजौरामध्ये हा हल्ला झाला. लीबियाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या फोटोमध्ये हल्ल्यानंतर आफ्रिकन प्रवासी एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. 

 
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सरकारी आपत्कालीन सेवेचे प्रवक्ते मालेक मर्सेक यांनी सांगितले की, या हल्ल्यात 40 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 80 लोक जखमी झालेत. त्रिपोलीमध्ये यूएन समर्पित सरकारने या हल्ल्याला खलीफा हफ्तारला जबाबदार असल्याचे सांगितले आहे.
अवैधरित्या इटलीला जाणाऱ्या आफ्रिकन प्रवाशांसाठी लीबिया मुख्य केंद्र आहे. याठिकाणाहून गरिब आणि युद्ध परिस्थितीमुळे स्थलांतरित करणारे आफ्रिकन इटलीला पलायन करतात. मात्र, या प्रक्रियेत अनेक प्रवाशांना लीबियाचे पोलीस अटक करतात. या प्रक्रियेला यूरोपियन यूनियनदेखील विरोध केला आहे. अवैधरित्या प्रवाशांना लीबियात वास्तव्य करण्यास बंदी आहे.