पुरात वाहुन गेलेल्या मुलीचा मृतदेह आढळला

    दिनांक :04-Jul-2019
शिरपूर: येथून जवळच असलेल्या वाघी बु. येथील 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान दोन शाळकरी बहीण-भाऊ पूजा बाळू पवार व पारस बाळू पवार ही दोन्ही भावंडे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले होते.
2 जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण करण्यात आले होते. दोन दिवस शोधमोहीम सुरू होती. 3 जुलै रोजी बहीण भावापैकी पारस बाळू पवार या मुलाचा मृतदेह अडोळ प्रकल्पाच्या पाण्यावर तरंगतांना दिसून आला. मात्र, मुलगी पूजा हीचा थांगपत्ता लागला नाही. तिसर्‍या दिवशी 4 जुलै रोजी स्थानिक मच्छिमार तरुणांना पुजा बाळू पवार हिचा मृतदेह जाळ्यात अडकलेला आढळून आला. त्यांनी मोठ्या हिमतीने तो बाहेर काढला. यासाठी राहुल बाभणे, महादेव बाभणे, बाळू बाभणे यांनी परिश्रम घेतले.

 
 
भावासाठी बहीणीनेही त्यागले प्राण
त्या पुलावरून येत असताना तीन विद्यार्थी वाहून जात होते. त्यामधील दोन विद्यार्थ्यांना तेथे असलेल्या एका युवकाने पकडून पाण्याबाहेर काढले. तो एकटा असल्याने त्याला दोघांना पकडता आले. मात्र, भाऊ (पारस पवार ) वाहून जात असल्याचे लक्षात येताच बहिणीने (पूजा पवार ) हीने आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली आणि आपल्या धाकट्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिला यश आले नाही. शेवटी तिचा हकनाक बळी गेला.