ऋषी कपूर यांचे खळाळून हसवणारे कमबॅक

    दिनांक :04-Jul-2019
मुंबई,
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर मोठ्या कालावधीनंतर नंतर 'झुठा कही का' या चित्रपटातून प्रेक्षकांना खळाळून हसवण्यासाठी कमबॅक करत आहेत. या चित्रपटात ऋषी कपूर व्यतिरिक्त जिमी शेरगिल,ओमकार कपूर आणि सनी सिंह विनोदी भूमिका करताना दिसणार आहे.या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर ड्रामा, कॉमेडी आणि खोटे बोलण्याची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. म्हणूनच या चित्रपटाचे या विषयाला साजेसे असेच आहे.
 
 
कर्करोगामुळे गेल्या एक वर्षापासून ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याने त्यांचे चाहते आनंदी आहेत. ' प्यार का पंचनामा २' या चित्रपटातील तारे सनी सिंह आणि ओमकार कपूर देखील खोटे बोलण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत, तर वडील ऋषी कपूरसुद्धा फ्लर्ट करताना दिसत आहेत. जिमी शेरगिल देखील एक वेगळ्या आणि कॉमेडी भुमिकेत सगळ्यांसमोर येणार आहे. सनी लिओनीच्या मरमेड लुकची झलक ट्रेलरमध्ये एका गाण्यात दिसत आहे आणि हे गाणे प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग याने तयार केले आहे. हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.