प्रभासने शेअर केला 'साहो'च्या गाण्याचा पहिला लुक

    दिनांक :04-Jul-2019
मुंबई,
दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा 'साहो' या आगामी सिनेमाचा टिझर लाँच झाल्यानंतर, या सिनेमातील गाण्याचा पहिला लुक समोर आला आहे. अभिनेता प्रभासने या गाण्यांचे दोन पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना शेअर केले आहे. एका पोस्टरमध्ये खुद्ध प्रभास असून, दुसऱ्या पोस्टरमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसत आहे.
 
 
पहिल्या पोस्टरमध्ये प्रभासने काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले असून, त्यात तो खूपच कुल दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर असून, पोस्टरमध्ये श्रद्धाचा ग्लॅमरस अंदाज दिसून येतोय. त्यात तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. 'हे डार्लिंग्स... हे 'साहो'चे पहिले गाणे आले आहे. तसेच 'द सायको सैय्या'चा टिझरही लवकर लॉंच करण्यात येईल.' असे कॅप्शनही प्रभासने या पोस्टरबरोबर दिले आहे. प्रभासचा 'साहो' या आगामी सिनेमाचा टिझर १३ जून रोजी प्रदर्शित केला होता. या टिझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. प्रभास आणि श्रद्धा कपूरचा हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.