बदलले नाव 'जजमेंटल है क्या'

    दिनांक :04-Jul-2019
मुंबई,
कंगना रनौत आणि राजकुमार राव अभिनित बहुप्रतीक्षित आणि वादग्रस्त चित्रपट 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलज रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कंगना आणि राजकुमार या दोघांच्याही अनोख्या अभिनयाची छाप पाहायला मिळत आहे. 'मेंटल है क्या?' चित्रपटाच्या नावाला मानसोपचार तज्ज्ञांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे सिनेमाचे नाव बदलून ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
 
या सिनेमाचा ट्रेलर 19 जून रोजीच रिलीज होणार होता. मात्र चित्रपटाच्या नावाला अनेकांनी विरोध केल्यामुळे ट्रेलर लॉन्चिंगची तारीख निर्मात्यांना पुढे ढकलावी लागली होती. 'ट्रस्ट नो वन'अर्थात कुणावरही विश्वास ठेवू नका अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. सिनेमाच्या कथेत कंगना आणि राजकुमार हे एका खुनामध्ये संशयित आरोपी असल्याचे निदर्शनास येत आहे. सिनेमात दोघेही काहिशे विक्षिप्त असल्याचंही दिसून येत आहे.
चित्रपटात कंगनाच्या कॅरेक्टरचे नाव 'बॉबी' तर राजकुमार यावं 'केशव' नावाच्या इसमाची भूमिका करत आहे. यामध्ये बॉबी बोल्ड अंदाजात दाखवली आहे तर राजकुमार राव एक सामान्य व्यक्तिरेखा रेखाटत आहे. एका दुहेरी हत्येच्या प्रकरणात पोलिसांना बॉबी आणि केशववर संशय असतो. यावर आधारीत ही कथा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे.
रोमांस, कॉमेडी आणि सस्पेंसचा जोरदार तडका
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रोमांस, कॉमेडी आणि सस्पेंसचा जोरदार तडका दिला आहे. हा चित्रपट एकटा कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सची निर्मिती आहे तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेमालुदी ने केलं आहे. आगामी 26 जुलै रोजी हा सिनेमा संपूर्ण देशभरात रिलीज होणार आहे.