अल्पवयीन बहिणींचे अपहरण करणाऱ्यास अटक

    दिनांक :04-Jul-2019
विधी संघर्षग्रस्त मुलगाही ताब्यात
नागपूर: दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करून त्यांना कळमेश्वर तालुक्यातील लोणारा या गावी लपवून ठेवणाऱ्या एका आरोपीला अटक करून विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले.
मेहबुबपुरा झोपडपट्टी येथील सय्यद जुबेर सय्यद रहमत अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अपहृत दोन्ही १४ आणि १६ वर्षीय बहिणी या आपल्या आईवडिलांसोबत पाचपावली हद्दीत बाबा बुढाजीनगर येथे राहतात. यातली १ मुलगी ही सहाव्या वर्गात तर दुसरी मुलगी ही सातव्या वर्गात मिलिंदनगर येथील एका शाळेत शिकतात. १ जुलै रोजी दुपारी दोघ्याही बहिणी शाळेत गेल्या. मात्र, सायंकाळी शाळा सुटून देखील दोघ्याही घरी आल्या नाही. बराच वेळ झाला तरी त्या घरी न आल्याने त्यांचा इकडेतिकडे शोध घेण्यात आला. लगेच ही माहिती पाचपावली पोलिसांना देण्यात आली. रात्रभर शोध घेऊनही त्या न सापडल्याने शेवटी २ जुलै रोजी पाचपावली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसात गुन्हा दाखल होताच सर्वप्रथम पोलिसांनी शाळेचे सीसी कॅमेरे तपासले. त्यात जुबेर हा मोठ्या मुलीला मोबाईल देताना दिसून आला. एक सूत्र पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर पोलिसांनी मुस्लिमबहुल.


 
 
 
पसिरात सीसी टीव्ही  कॅमेरात दिसून आलेल्या तरुणाचा शोध सुरू केला. यशोधरानगर हद्दीत जुबेर हा पोलिसांना मिळून आला. त्यानुसार बुधवारी त्याला अटक करण्यात आली. सुरूवातीला त्याने ‘तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर तो फुटला आणि त्याने दोन्ही बहिणींचे अपहरण केल्याची कबुली दिली. दोन्ही बहिणींना लोणारा (ता. कळमेश्वर) येथे एका नातेवाईकाकडे ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिस पथक रात्री दीडच्या सुमारास लोणारा या गावी गेले आणि दोन्ही बहिणींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेरसोबत मोठ्या बहिणीचे तर विधी संघर्षग्रस्त मुलासोबत लहान बहिणीचे प्रेमप्रकरण सुरू होते. दोन्ही मुलींना काही दिवस लोणारा येथे ठेवून ते अजमेरला पळून जाणार होते. त्यानंतर ते मध्य प्रदेश येथे राहणार होते असेही पोलिसांनी सांगितले. अजमरेला पळून जाण्यापूर्वीच त्या पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.
ही कामगिरी पो. नि. अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुरेश सुरोशे, महिला उपनिरीक्षक रामटेके, हे. कॉ. चिंतामण डाखोळे, शिपाई रविशंकर मिश्रा, राकेश तिवारी, विनोद बरडे, नितीन धकाते यांनी केली.