कुलभूषण जाधव प्रकरणाचा फैसला चालू महिन्यात

    दिनांक :05-Jul-2019
नवी दिल्ली,
पाकिस्तानात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याविषयीचा फैसला आंतरराष्ट्रीय न्यायालय १७ जुलैला जाहीर करणार आहे. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असणाऱ्या जाधव यांना मार्च 2016 मध्ये पाकिस्तानात अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात हेरगिरीचा कांगावा करून पाकिस्तानी लष्करी न्यायालयात खटला चालवण्यात आला. त्यांना एप्रिल 2017 मध्ये दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली.
 
 
त्याविरोधात भारताने मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागितली. त्या न्यायालयाने पाकिस्तानला शिक्षेची अंमलबजावणी करण्यापासून रोखले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकूून घेतली. जाधव यांच्यावर खोटा आरोप ठेऊन त्यांच्याविरोधात खटला चालवण्यात आला. त्यांची सुटका करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भारताकडून करण्यात आली आहे.