देशाच्या जीडीपीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र ५० टक्के योगदान देणार

    दिनांक :05-Jul-2019
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
 
 
नवी दिल्ली, 
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीचे स्वागत करताना, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा सध्या 29 टक्के असला, तरी तो येत्या काही वर्षात 50 टक्के करण्याचा निर्धार केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी व्यक्त केला.
 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी आज संसदेत मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना गडकरी म्हणाले की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाने आतापर्यंत 11 कोटी लोकांना रोजगार दिला आहे. येत्या पाच वर्षांत आणखी 5 कोटी रोजगार निर्माण करून ही संख्या 15 कोटींवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 
भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्रालयासाठी असलेल्या तरतुदीत 5 हजार कोटींनी वाढ करण्यात आल्यामुळे ही तरतूद 78 हजार कोटीवरून 83 हजार कोटींवर जाणार आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपये सेस लावण्याच्या निर्णयामुळे केंद्रीय रस्ते निधीतही (सीआरएफ) वाढ होणार आहे, त्याचा फायदा रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना होणार आहे. आतापर्यत देशात 44 हजार किमी लांबीच्या रस्ते आणि महामार्गाची कामे झाली असून येत्या पाच वर्षांत हा आकडा सवा लाख किमीपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 
ग‘ामीण भागाच्या विकासाला अर्थसंकल्पातून झुकते माप दिल्यामुळे आतापर्यत ग‘ामीण भागातील लोक शहरी भागाकडे धाव घेत होते, पण आता ग्रामीण भागाचा परिपूर्ण विकास होणार असल्यामुळे शहरी भागातील लोकांची धाव ग‘ामीण भागाकडे वाढली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.