CWC2019 : धोनीने आणखी एक-दोन वर्षे क्रिकेट खेळावे- लसिथ मलिंगा

    दिनांक :05-Jul-2019
यंदाचा विश्वचषक भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीसाठी म्हणावा तितका चांगला जात नाहीये. गेल्या काही सामन्यांमध्ये धोनी आपल्या संथ फलंदाजीमुळे सोशल मीडियावर टीकेचा धनी बनला आहे. अनेक चाहत्यांनी धोनीने विश्वचषकानंतर निवृत्ती स्विकारावी असे म्हटले होते. मात्र श्रीलंकेचा जलदगती गोलंदाजी लसिथ मलिंगाच्या मते धोनीने, पुढील किमान १ ते २ वर्ष क्रिकेट खेळत रहावे.
 
 
“माझ्या मते धोनीने पुढचे १ ते २ वर्ष क्रिकेट खेळत रहावे. गेल्या १० वर्षांमध्ये मी त्याच्यासारखा सर्वोत्तम फिनीशर खेळाडू बघितलेला नाही. भविष्यकाळात कोणताही खेळाडू त्याला मात देऊ शकले असे मला वाटत नाही. धोनीने आपला हा अनुभव नवीन खेळाडूंपर्यंत पोहचवायला हवा. धोनीसारख्या खेळाडूमुळेच भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आताच्या घडीला सर्वोत्तम संघ आहे. कोणत्याही संघाला कोणत्याही स्पर्धेत हरवण्याती ताकद भारतीय संघामध्ये आहे.” मलिंगा वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.