budget 2019: आता आयकर भरण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे नाही

    दिनांक :05-Jul-2019
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. सकाळी निर्मला सीतारामन संसदेत आल्या. त्या बजेट सादर करताना त्यांचे आई वडीलही संसदेत आले होते. संसदेत पोहचल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

अनेक घोषणा निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत. लघू उद्योजकांना त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अति श्रीमंतांवरचा कर मोदी सरकारने वाढवला आहे. दरम्यान टॅक्स स्लॅबमध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. करदात्यांबाबत बोलताना सुरूवातीलाच त्यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. १ रुपया, २ रूपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांचं नाणं आणलं जाणार आहे. अंध व्यक्तींना ही नाणी ओळखता येतील अशा प्रकारची नाणी असणार आहेत अशीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात त्याबाबत नाराजी पाहण्यास मिळाली आज सकाळी ११२ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स बजेटनंतर ३३४ अंकांनी कोसळला आहे.