संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर

    दिनांक :05-Jul-2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर याच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेले  ॲड. संजीव पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून आज ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

 
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यानंतर दोघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण न्यायाधीश रेट्टे यांनी पुनाळेकर आणि भावे यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. त्यानुसार काल कोठडीची मुदत संपल्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.