प्रोटीन्सची कमतरता हानीकारक

    दिनांक :05-Jul-2019
शरीरात योग्य प्रमाणात प्रोटिन नसेल तर शरीरसोबतच दातांचं आणि हिरड्यांच्या आरोग्याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. प्रोटीनच्या कमतरतेमुळे चारपैकी तीन लोक हिरड्या आणि दातांच्या आजाराने त्रस्त असतात. पस्तीशीनंतर या आजारांचं प्रमाण वाढतं. प्रोटिनच्या कमरतेमुळे दातांची मुळं कमजोर होतातच शिवाय दात किडण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणावर होतो. चिकन किंवा अंडी यासारखे पदार्थ प्रोटीनचे समृद्ध स्त्रोत मानले जातात. प्रति दिन 1000 मिलिग्राम प्रोटिन आणि व्हिटामिन्सच्या सेवनाने हिरड्यांच्या त्रासांपासून लांब राहता येतं. 

 
 
प्रोटिनच्या कमतरतेमुळे होणारे दातांचे काही आजार पुढीलप्रमाणे-
 
जिंजीवायटीस- या आजारामध्ये हिरड्या लाल होणं, हिरड्यांची मुळं कमकुवत होणं ही लक्षणं दिसून येतात. काही वेळा दातांमध्ये एक त्रिकोणी भाग तयार होतो ज्यामुळे व्यक्तीला वेदनांना सामोरं जावं लागतं. पांढर्‍या कोशिकांचं विशिष्ट ठिकाणी झालेलं एकत्रीकरण हे देखील िंजजिवायटीसचं कारण असू शकतं. िंजजीवायटीसवर योग्य वेळी उपचार केले गेले नाहीत तर पेरोडोंटायटीस चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.
 
पायोरिया- पायोरिया हा हिरड्यांशी संबंधित आजार आहे. ब्रश करताना िंकवा काहीही खाताना हिरड्यातून रक्त येणं हे पायोरियाचं लक्षण समजलं जातं. या व्याधीमध्ये हिरड्याच्या मुळांना धक्का पोहचून ती कमकुवत व्हायला सुरवात होते. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दातांची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे.
 
पेरीओडोंटायटीस- या आजारामध्ये दाताच्या आतील आवरणावर परिणाम होऊन दात सुट्टे व्हायला लागतात. सुट्या झालेल्या दातांमध्ये कीड वाढीस लागून ते मुळापासून विलग होऊन पडू लागतात. योग्य आहार आणि वेळोवेळी केली जाणारी स्वच्छता दातांचं आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात.