वुडन वर्क

    दिनांक :05-Jul-2019
 अवंतिका तामस्कर
 
घराच्या सजावटीसाठी सुंदर, नक्षीदार लाकूड असेल, तर आणखी काय हवे. अशा प्रकारची कलाकृती पाहून कोणीही प्रेमात पडू शकते. घरात येणारे पाहुणे देखील घराच्या सौंदर्याला हुरळून न गेले तर नवलचं!
 
वुड कार्व्हिंग हे पारंपरिक सजावट म्हणून पाहिले जाते. मात्र आजच्या काळात ते समकालीन आणि ट्रेंडी मानले जाते. थायलंड आणि इंडोनेशियासारख्या देशात आणि आपल्याकडे केरळमध्ये नक्षीदार टीकवूड बांधणीच्या घराची लोकप्रियता वाढली आहे. अर्थात संपूर्ण घर वुड कार्व्हिंगने सजवणे महागात पडू शकते. म्हणूनच आपल्या घराला आलीशान करण्यासाठी आणि मेंटेन राखण्यासाठी बराच अंशी खिसा रिकामा करावा लागतो. 

 
 
अशा घरात ‘होम मेकर्स’ हे अन्य पर्याय म्हणून संपूर्ण घराला सजवण्यापेक्षा काही खास भागातच सजावट करण्यावर भर देताना दिसून येतात. मग घराचे इंटिरियर असो किंवा एक्सटिरियर. वुड कार्व्हिंगच्या सजावटीतून घराच्या सौंदर्यात आणखीच भर पडते. सर्वात म्हणजे वुड कार्व्हिंगमध्ये फिनििंशगला किंवा सफाईला अत्यंत महत्त्व आहे.
 
मॉल्डिंग : मॉल्डिंग हे प्रत्येक प्रकारच्या वुडन होम डेकोरचा महत्त्वाचा भाग आहे. हे मॉल्डिंग अनेक प्रकारचे असतात. जसे की क्राऊन मॉल्डिंग, फीज मॉल्डिंग आणि पॅन मॉल्डिंग. छत आणि भिंतीला जोडणार्‍या जागी क्राऊन मॉल्डिंगचा उपयोग केला जातो. याप्रमाणे फ्रीज मॉल्डिंगमधून भिंतीची चार ते पाच फुटाची जागा झाकता येते. अशा प्रकारच्या कलाकृतीतून िंभत अधिकच शानदार दिसते. याप्रमाणे पॅनल मॉल्डिंगचा वापर आपण भिंतीच्या खालच्या भागातही करू शकतो. आपण कोणत्याही पद्धतीने लाकडाची ढाल करत भिंतीला विविध आकार देऊ शकतो. सजावटीच्या दृष्टिकोनातून वुडन वर्क हे एखाद्या कुशल कारागिराकडून किंवा क्राफ्टसमनकडून केलेले कधीही चांगले ठरू शकते. तीन ते चार फुटांपर्यंत लाकडाच्या आधारावर फळ, फूल आणि अनेक प्रकारच्या डिझाईन तयार करून सजावटीला चार चांद लावू शकतो. रचनेत बदल करून त्याला पारंपरिक डिझाईनबरोबरच ट्रेंडी देखील करता येऊ शकते.