‘बाहुबली’ सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी

    दिनांक :05-Jul-2019
राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटानं बॉलिवूडची समीकरणं बदलून टाकली. आता या चित्रपटाची सीरिज येणार आहे. त्यात अनेक मराठी चेहरे पाहायला मिळणार असल्याचं कळतंय.
 
 
 
त्यातलंच एक मोठं नाव आहे अतुल कुलकर्णी. त्याची नेमकी भूमिका काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, या सीरिजचा तो एक महत्त्वाचा भाग असणार आहे असं समजतंय. त्यामुळे या सीरिजविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.