ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर सह वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री

    दिनांक :05-Jul-2019
नागपूर: राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शासनाने नागपूरसह वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज विविध जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्या यादीत पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे वर्धा जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जवाबदारी सोपविण्यात आली आहे. ना. बावनकुळे यांनी यापूर्वी भंडारा जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी सक्षमपणे व यशस्वीरीत्या पार पाडली आहे.