CWC2019: हॅरी केन आणि विराट कोहली यांच्यात क्रिकेटचा डाव रंगला

    दिनांक :05-Jul-2019
लॉर्ड्स,
इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू हॅरी केन आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात क्रिकेटचा डाव रंगला. प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि गोल्डन बूटचा मानकरी ठरलेला हॅरी केन क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आला होता. यावेळी केनने क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

 
विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत भारताचा सामना इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यजमान इंग्लंड संघाला विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघ आव्हानात्मक ठरेल, अशी चर्चा आहे. अशातच इंग्लंडच्या हॅरी केन आणि विराट कोहली यांची सदिच्छा भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.
 
 
हॅरी केन याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून या भेटीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अलीकडेच विराट कोहलीसोबत लॉर्ड्सवर उत्तम वेळ घालवला. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचा सामना झाला, तर हा सामना सोडून भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेसाठी शुभेच्छा, अशी मजेशीर पोस्ट केन याने व्हिडिओबरोबर शेअर केली आहे. या भेटीदरम्यान केन याने गोलंदाजी आणि फलंदाजीचा आनंद घेतला.