सिनेक्षेत्रात काम करणाऱ्यांचा हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड

    दिनांक :05-Jul-2019
अलिबाग : एका हायप्रोफाईल सेक्स आणि ड्रग रॅकेटचा रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ५ महिलांसह ९ जणांना पोलीसांनी अटक केली. वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ७ मुलींची रवानगी कर्जतच्या सुधारगृहात करण्यात आली आहे. यामध्ये सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या मुली असल्या्ची माहिती मिळाली आहे .
 
 
 
महत्वाचे म्हणजे आरोपींकडे २६ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते. अलिबागच्या किनारपटटी भागातील बंगले भाडयाने घेवून अशा प्रकारे देहव्यवसाय आणि अंमली पदार्थाचा व्यापार चालत असल्यााची माहिती पोलीसांना मिळाली होती . त्या्नुसार पोलीसांनीच मोठया खुबीने या क्षेत्रात काम करणाऱ्या राखी नोटानी व रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांचे मोबाईल नंबर मिळवले. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठराविक रक्ककम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितली. त्यानंतर या दोघींनी त्यांच्या संपर्कात असलेल्या मुलींची नाव कळवून सौदा निश्चित केला . त्याप्रमाणे काल रात्रीसाठी दोन बंगले ऑनलाईन बुक करण्यात आले. तेथे अशा पार्टीचे आयोजन करण्यात आले .
तेथे बनावट ग्राहक पाठवून त्याच्याकडे पैसेही देण्यानत आले . या बनावट ग्राहकांनी सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला .
महिला पोलीसांनी राखी नोटानी व रंजिता सिंग यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २६ ग्रॅम कोकेन आढळून आले . राखी नोटानी, रंजीत सिंह उर्फ रेणु, राजकमल, निकेश मोदी, वरुण अदलखॉ, सईद अमीर रज्जाक , सिमा सिंग, श्रुती गावकर,आरोही सिंग अशी या आरोपींची नावे आहेत . त्यांच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधि नियम तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वेये गुन्हा दाखल करून त्याना अटक करण्या त आली आहे. आज या सर्व आरोपींसह देहव्यापारासाठी आलेल्या ७ मुलींना अलिबाग न्यायालयासमोर हजर केल्यानंतर या मुलींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे .