विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

    दिनांक :05-Jul-2019
 देवठाणा खांब येथील घटना
मालेगाव: तालुक्यातील देवठाणा खांब येथील  उषा शंकर राठोड या विवाहीत महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल ४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान देवठाणा खांब शेतशिवारात घडली.

 
मृतक उषा शंकर राठोड यांचा चुलत दीर इंद्रजीत सुरेश राठोड याने मालेगाव पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार  उषा राठोड ही गावातीलच रीना जाधव सोबत शेतामध्ये जात असताना वाटेत देवठाणा खांब शिवारातील सरकारी विहिरीजवळआल्या. त्यानंतर उषा रिनाला म्हणाली तू समोर हो मी मागून आलीच यानंतर रिना जाधव ही थोडी समोर जाऊन मागे वळून बघितले असता उषा राठोड ही दिसलीच नाही. वापस येऊन सरकारी विहिरीजवळ आली असता विहिरीवर उषा राठोड हिच्या पायातील चप्पल व कळशी दिसून आल्याने रीनाने ही बाब गावात सांगितली. यानंतर गावातील नागरिकांनी सरकारी विहीरवर धाव घेऊन विहिरीत गळ टाकून पाहिले असता उषाचा मृतदेह आढळला. पुढील तपास ठाणेदार आधार सिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम राठोड हे करीत आहेत.