भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी परिणय फुके

    दिनांक :05-Jul-2019
भंडारा: राज्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पदी परिणय फुके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज या संदर्भात शासन आदेश काढण्यात आला. परिणय फुके हे भंडारा-गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सदस्य असून नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळात फुके यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. त्यामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद फुके यांच्याकडे येणार अशी चर्चा होती. भंडाराचे विद्यमान पालकमंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.