रेल्वे खासगीकरणाकडे, पीपीपी मॉडल राबवणार

    दिनांक :05-Jul-2019
नवी दिल्ली,
रेल्वेच्या विकासासाठी रेल्वेत खासगी भागिदारी वाढविण्यावर केंद्रीय अर्थसंकल्पात जोर देण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे लवकरच खासगीकरणाच्या दिशेने जाण्याचे संकेत मिळत आहेत.

 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेच्या विकासावर जोर दिला. रेल्वेच्या विकासासाठी ५० लाख कोटींची अवश्यकता आहे. त्यामुळे रेल्वेत पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप) मॉडल राबविण्यात येणार आहे. रेल्वेत खासगी भागिदारी वाढवण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
आमचं लक्ष्य रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म करणं आहे. समुद्री मार्गांची निर्मिती करणं हे आणचं लघ्य असून वन नेशन, वन ग्रीडवरही आमचा जोर असेल. त्यासाठी ब्लूप्रिंट तयार करण्यता येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्डची घोषणा
यावेळी सीतारामन यांनी नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्डचीही घोषणा केली. या कार्डचा वापर रेल्वे आणि बसेसमध्ये केला जाणार आहे. रुपे कार्डच्या मदतीने हे कार्ड चालवलं जाणार आहे. यात बसचं तिकीट, पार्कींगचा खर्च, रेल्वेचं तिकीट सर्व एकत्र काढता येऊ शकेल.