धरण फोडणाऱ्या खेकड्यांना अटक करा!

    दिनांक :05-Jul-2019
मुंबई:  राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्यांनी पोखरल्यामुळे तिवरे धरण फुटले असा तर्क लावल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने तर तिवरे धरणफुटीला जबाबदार असलेल्या खेकड्याला अटक करा, अशी उपरोधिक मागणी थेट पोलिसांकडे केली आहे. तिवरे धरणफुटीने २३ जणांचा बळी घेतला. स्थानिक आमदाराचा भाऊ या धरणाचा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याला अद्याप का अटक झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करतानाच निदान हे धरण फोडणाऱ्या खेकड्याला तरी अटक करा, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. जितेंद्र आव्हाड, माझी खासदार आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी खेकडे घेऊन ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये जात चक्क खेकड्यांना पोलिसांच्या हवाली केले.