CWC2019: अन् रवींद्र जडेजा मांजरेकरांवर भडकला

    दिनांक :05-Jul-2019
बर्मिंगहॅम,
भारतीय संघाकडून खेळत असलेल्या खेळाडूंचा मान राखण्यास संजय मांजरेकर यांनी शिकले पाहिजे. मी त्यांच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही अशा शब्दांत रवींद्र जडेजा याने आपल्यावरील टीकेस उत्तर दिले आहे.
 
 
मांजरेकर यांनी अलीकडेच भारतीय संघाच्या कामगिरीबाबत टीका करताना लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी व जडेजा यांच्यावर टीका केली होती. जडेजा हा विश्‍वचषकासाठी अयोग्य खेळाडू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. या टीकेस उत्तर देताना जडेजा याने म्हटले आहे की, मांजरेकर यांच्यापेक्षा मी दुप्पट आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत व अजूनही मी खेळत आहे. 151 सामन्यांमध्ये 2 हजार 35 धावा व 174 विकेट्‌स ही माझी कामगिरी खूपच बोलकी आहे.