डोक्यात दगड घालून पत्नीने केली पतिची हत्या

    दिनांक :05-Jul-2019
इचलकरंजी : मद्यपी पतीच्या जाचाला कंटाळून इचलकरंजी येथे पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. इचलकरंजी शहरालगत असलेल्या यद्राव गावात आर. के. नगर परिसरात ही घटना आज सकाळी ११ वाजता घडली. शिवाजी विठोबा देवेकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गीता देवेकर असे आरोपी महिलेचे नाव आहे.

 
गीता देवेकर व बाळू उर्फ शिवाजी दिवेकर यांच्यात वारंवार भांडण होत असे. मद्यपी पतीकडून होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नीने दगड घालून हत्या केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पती संशय घेत असल्याची तक्रार होती. घटनास्थळी शहापूर पोलीस दाखल झाले असून गीता दिवेकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.