छत्तीसगडमध्ये चार नक्षल्यांचा खातमा

    दिनांक :06-Jul-2019
- तीन महिलांचा समावेश
रायपूर,
छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी चार नक्षलवाद्यांना एका चकमकीत ठार मारले. यात तीन महिला नक्षलींचा समावेश आहे. 

 
 
खल्लारी आणि मेचका या गावांदरम्यान असलेल्या जंगलात काही नक्षलवादी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष कृती दलाच्या जवानांनी आज सकाळी मोहीम हाती घेतली. जवानांना पाहताच नक्षल्यांनी गोळीबार केला. यावेळी ही चकमक झाली. ठार झालेल्या सर्व नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
 
नक्षल्यांकडून गोळीबार बंद झाल्यानंतर जवानांनी तपास मोहीम हाती घेतली असता, चार नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांच्याजवळ रायफलीही पडल्या होत्या. तर जंगलात काही अंतरापर्यंत रक्तही सांडले होते. यावरून, काही नक्षलवादी जखमी झाले असून, त्यांनी पळ काढला असल्याचे दिसून येते, अशी माहिती राज्याचे पोलिस उपअधीक्षक सुंदरराज पी. यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.