बदल मुलांच्या अभ्यासिकेतील

    दिनांक :06-Jul-2019
सध्या परीक्षांचा माहोल आहे. यामुळे मुलं अभ्यासात गढून गेली आहेत. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी भरपूर अभ्यास केला पाहिजे. मेहनत घेतली पाहिजे. त्याशिवाय यश मिळू शकत नाही. पण काही मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. पाठांतर करून काही लक्षात रहात नाही. खूप अभ्यास केला तरी चांगले गुण मिळत नाहीत. अभ्यासिकेतल्या वास्तूदोषांमुळे असं होऊ शकतं. मुलांच्या अभ्यासिकेची रचना करताना या बाबी ध्यानात घेतल्या तर वास्तूदोष दूर होऊन त्यांना यश मिळू शकतं. 

 
  • मुलांच्या अभ्यासाचं टेबल चौकोनी असावं. गोल किंवा अंडाकृती टेबलवर अभ्यास केल्याने अपेक्षित यश मिळत नाही.
  • अभ्यासाच्या टेबलच्या पृष्ठभागाचा रंग पांढरा, राखाडी किंवा फिकट गुलाबी असला पाहिजे. पृष्ठभागाचा रंग फार गडद असू नये.
  • अभ्यासाच्या टेबलवर पुस्तकांव्यतिरिक्त दुसरं काहीही ठेऊ नये.
  • बंद घड्याळं, तुटलेली पेनं, पेन्सिली, चाकू, सुरी, कात्री अशी हत्यारं ठेऊ नये.
  • कॉम्प्युटर टेबलच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायला हवा. टेबलच्या ईशान्य कोपर्‍यात म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला कॉम्प्युटर ठेऊ नये.
  • अभ्यासाचं टेबल जिन्याखाली ठेऊ नये.
  • स्वीच बोर्ड अभ्यासाच्या खोलीच्या ईशान्य कोपर्‍यात असू नये. ही दिशा सोडून दुसर्‍या दिशेला लावता येईल.
  • अभ्यासाच्या खोलीत छोटं मंदिर किंवा देवाची मूर्ती ठेवावी.
  • विद्यार्थ्यांनी देवासमोर दिवा लावायला हवा. यामुळे देवाची कृपा राहिल आणि अभ्यासात यश मिळू शकेल.