राहुल गांधी मैदान सोडून पळाले- रावसाहेब दानवे

    दिनांक :06-Jul-2019
मुंबई : पक्षाच्या उमेदीच्या काळात गांधी घराण्याने अध्यक्षपद भोगले. परंतु आज पक्षाला उभारी देण्याची गरज असताना राहुल गांधी मैदान सोडून पळत आहेत, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
 
 
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्यान राहुल गांधींच्या राजीनाम्यावर रावसाहेब दानवे यांनी निशाणा साधला. गेल्या एक महिन्यापासून काँग्रेस पक्ष अध्यक्षाविना चालत आहे. कोणी अध्यक्ष होण्यास तयार नाही. पक्षाच्या उमेदीच्या काळात गांधी घराण्याने अध्यक्षपद भोगले. परंतु आज पक्षाला उभारी देण्याची गरज असताना राहुल गांधी मैदान सोडून पळत आहेत, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
इतकेच नव्हे तर भाजपच्या सुरुवातीच्या काळात केवळ दोन खासदार निवडून आले म्हणून टिंगल-टवाळी करण्यात आली. परंतु कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे केंद्रात सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार सत्तेवर आले. दुसरीकडे दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली? काँग्रेसला संघटनात्मक मजबूत करण्याची गरज असताना राहुल गांधी व गांधी घराणे मैदान सोडून पळ काढत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.