शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांवर कारवाई करा : अशोक चव्हाण

    दिनांक :06-Jul-2019
मुंबई : पीककर्ज देताना बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असा ठपका ठेवत पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुजोर बँकांवर कारवाई करावी अशी मागणी माजी खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 
 
 
शेतकऱ्यांच्या पीककर्ज प्रश्नावरून अशोक चव्हाण यांनी बँकांवर निशाणा साधला. पीककर्ज देताना बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. कागदपत्र पुर्ततेच्या नावाखाली शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले .
 
इतकेच नव्हे तर ऐन खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुजोर बँकांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि त्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.