बुरूंगले शाळेने आम्हाला सुसंस्कारीत बनवले- नंदु कुळकर्णी

    दिनांक :06-Jul-2019
शेगांव: शाळेत असतानाचे संस्कार न विसरता शाळा सुटल्याच्या 10/12 वर्षा नंतर त्या शाळेतील विद्यार्था करीता काहीतरी करण्याची धडपड 'गुड न्युज' म्हणूनच गणल्या जाईल। शेगांव मधील काही विद्यार्थी येथील प्रतीष्ठीत श्री मस्कुजी बिरुजी बुरुंगले शाळेत शिकले शिकुन मोठे झाले चारवर्षा पु्रवी whatsapp ग्रूपनी परत एकत्र आले आणी एक अनोखि कल्पना घेऊन आले ह्या माजी विद्यर्था पैकि कोणी उच्चपदस्त अधीकारी झाले कोणी पोलीस कोणी उद्योग तर कोणी डाँक्टर इंजिनीअर परंतू अत्यंत कष्ठाने त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले शिकतांना गरच्या गरीबीचे सर्वसाधारण परीस्थितीचे चटके त्यांनी सहन केले शाळेचे साहीत्य सुध्दा पुर्णपणे यांचे जवळ नसायचे पण आज परीस्थीती बदली परंतू परीस्थीतीची जाणीव कायम ठेवत या सुजनांनी गेल्या चार वर्षा पासुन शेगांव मधील विविध शाळेमधील होतकरु गरीब विद्यार्थांना आपल्या परीने मदत करायला सुरवात केली यंदा जवळपास 70 हजाराचे शालेय साहीत्य त्यांनी विद्यार्थांना भेट दिले या मिळालेल्या भेटिचा उपयोग करून त्यांनी चांगले शिकावे आणी पुढे जाऊन अशीच मदत ईतरांना करावी एव्हडीच अपेक्षा या शालेय ग्रुपची आहे. हे काम करण्याची प्रेरणा या शाळा ग्रुपच्या सदस्यांना श्री मस्कुजी बिरुजी बुरुंगले या शाळेतून मिळाली शाळेच्या मैदानावर झालेले संस्कार त्यांना जिवनात उतुंग कामे करण्याची प्रेरणा देत आहे आपल्यातला न्यूनगंड काढा जे योग्य असेल तेच करा असा संदेश आज या शाळाग्रुपने विद्यार्थांना दिला आज त्यांनी राष्ट्रमाता इंदिरागांधी विद्यालयात हि भेट दिली यावेळी शाळेचे प्राचार्य व्हि. व्हि. सावळे यांनी या ग्रुपला धन्यवाद दिले यावेळी शाळाग्रुपचे राजेश गिते श्रीनिवास कुळकर्णी पुरुषोत्तम शित्रे मंगेश लोखंडे प्रशांत अघाव डाँ निखिल पांडे प्रविण मोरखडे  यांच्यासह सदस्य उपस्थीत होते यावेळी कार्यक्रमाचे संचलन जयंत वानखडे यांनी केले आभार राजेश गवई यांनी मानले.