कंगनाचा 'धाकड' अवतार

    दिनांक :06-Jul-2019
मुंबई
बॉलिवूडची क्वीन कंगना रनौट अॅक्शन गर्लच्या रुपात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. तिच्या 'धाकड' या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'धाकड' हा अॅक्शनपट असून कंगनासाठी हा चित्रपट खूपच महत्त्वाचा आहे.
 
 
'माझं करिअर केवळ माझं नाही तर भारतीय सिनेसृष्टीचाही हा प्रवास आहे. हा बॉलिवूडमधील पहिला महिला प्रधान अॅक्शनपट असून हा सिनेमा प्रत्येक गोष्टीत कसा वरचढ ठरेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सणासुदीच्या काळात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना धाकड आवडला तर सिनेसृष्टीतील अभिनेत्रींना कधी मागे वळून पाहावं लागणार नाही. हा सिनेमा आमचं ड्रिम प्रोजेक्ट असून या चित्रपटात काम करणयासाठी मी फार उत्सुक आहे', असं कंगनानं म्हटलं आहे. दिग्दर्शक रजनीश रेजी घई हे दिग्दर्शकाच्या खुर्चीवर असणार आहेत. तर, चिंतन गांधी आणि रिनिश रविंद्र लेखन करणार आहेत. सिनेमाचे चित्रीकरण भारताशिवाय युरोमध्येही होणार आहे.