पॅनलच्या पट्ट्यात अडकून कामगाराचा मृत्यू

    दिनांक :06-Jul-2019
अकोला: वणीरंभापूर येथील अंबिका सोयाबीन कंपनीत कार्यरत 22 वर्षीय दत्तात्रय श्रीराम चोपडे या कामगाराचा पॅनलच्या पट्टयात अडकून दुर्देवी मृत्यू झाला.
कोळंबी येथे राहणारा दत्तात्रय श्रीराम चोपडे हा तरुण रोजंदारीवर अंबिका सोयाबीन कंपनीत रात्रपाळीवर पॅनेल मशीनवर कुटार टाकत होता. अचानक कुटारा सोबत मशीन मध्ये अडकल्याने त्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहीती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच ठाणेदार हरीश गवळींसह पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.